सोलापूर – श्री 1008 भगवान बाहुबली मंदिर विजापूर रोड येथे भगवान महावीर मोक्षकल्याण दिवस साजरा करण्यात आला. व कुंथलगिरी येथे चोरीस गेलेल्या मूर्ती लवकरात लवकर मिळावे यासाठी जिनेश्वर चरणी वंदन करून सर्व श्रावकांनी बहूसंखेने उपस्थित राहून श्री 1008 पार्श्वनाथ भगवंताचे, श्री 1008 महावीर भगवंताचे, श्री 1008 मूलनायक मुनिसुव्रत भगवंताची व श्री 1008 बाहुबली भगवंताचे णमोकार महामंत्राने पंचामृत अभिषेक आणि शांतीमंत्राने पूजन करण्यात आले. तसेच कुंथलगिरी तीर्थ क्षेत्रावर आलेले संकट आणि दुःख परिहार करण्यासाठी भक्तीने श्रद्धेने भगवंत चरणी वंदन करून प्रार्थना केली.
गेलेल्या सर्व प्रतिमा लवकरात लवकर मिळून वेदीवर विधी विधानाने विधिवत विराजमान होण्यासाठी सर्वांनी दरररोज जाप करण्याचा व दररोज एक नियम घेण्याचा निश्चय केला आहे. वरील संपूर्ण विधिवत पूजा श्री माणिक उपाध्ये पंडित यांनी केली. या वेळेस मंदिर समितीचे सर्व ट्रस्टी व बहुसंख्य जैन समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी णमोकार महामंत्र मंडळ विजापूर रोडच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.




















