सांगोला – स्व.प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमित्त ललित, कला व नाट्य तंत्र शिक्षण महाविद्यालय शांतिनिकेतन लोक विद्यापीठ, सांगली यांनी राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेमध्ये सांगोल्यातील श्रीराम महिला भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सदर स्पर्धेमध्ये ३१ संघांनी सहभाग घेतला होता. सूर, ताल, लय, सांघिक मेळ यासर्व निकषावर प्रा.विलास वांगीकर यांनी हे महिला भजनी मंडळ स्थापन केले आहे. सदर स्पर्धेमध्ये शुभांगी कवठेकर, सुरेखा वांगीकर, विजया देशपांडे, शिला झपके, ज्योती दौंडे, मंगल कांबळे, भाग्यश्री गुरव, पल्लवी कुलकर्णी या भजनी मंडळाच्या सदस्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये हार्मोनियमची साथ शशिकांत लाटणे व तबल्याची साथ पौर्णिमा गोडसे हिने केली.
याच मंडळाने औंध येथील राज्यस्तरीय स्पर्धेत ही क्रमांक प्राप्त करून एका आठवड्यात दुहेरी यश संपादन केले. या दुहेरी यशाबद्दल श्रीराम महिला भजनी मंडळाच्या सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

























