सोलापूर – शहरात रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी “श्रीराम नाम-संकीर्तन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूर शहरात एकूण ८८ ठिकाणी याचे नियोजन करण्यात आले होते.
शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती. संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी सामूहिक नामस्मरण आयोजित केले होते त्यामुळे मंदिर परिसर श्रीराम नमाने दुमदूमले होते. सामूहिक नामजपानंतर उपस्थित भाविकांनी “श्रीराम राज्याप्रमाणे आदर्श, न्यायपूर्ण आणि धर्माधिष्ठित हिंदूंचे राज्य निर्माण होवो” अशी प्रार्थना भावपूर्ण केली आणि हिंदुराष्ट्र स्थापनेची सामूहिक शपथ घेण्यात आली.
याकरिता सर्वांनी संघटित होऊन धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. वातावरणात भक्ती, श्रद्धा आणि राष्ट्रभावना यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. उद्याही काही ठिकाणी या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.



















