सोलापूर : एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव, सोलापूर येथे विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘उमंग 2026’ दिनांक ८ व ९ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या दोन दिवसीय महोत्सवात रांगोळी, मेहंदी, छायाचित्रण, फेस पेंटिंग, कार्टून/स्पॉट पोस्टर, कोलाज, क्ले मॉडेलिंग, इन्स्टॉलेशन, क्विझ, वक्तृत्व (मराठी, हिंदी, इंग्रजी), वादविवाद, एकल व समूह गायन, एकल व समूह नृत्य, स्ट्रीट प्ले, फॅशन शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धांमध्ये ई अँड टीसी (E&TC) विभागाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सांस्कृतिक विभागाची सर्वसाधारण (General) चषक विजेती म्हणून बाजी मारली. मिस्टर सिंहगड हा मानाचा किताब यशदीप शिंदे (जनरल सायन्स इंजिनिअरिंग) यांनी, तर मिस सिंहगड हा किताब किरण सुरवसे (कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग) यांनी पटकावला. याचबरोबर गोल्डन बॉय – यशदीप शिंदे (GSE) आणि गोल्डन गर्ल – गायत्री फवाडे (E&TC) यांना विशेष गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ शंकर नवले यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुवर्णा क्षीरसागर, डॉ. करीम मुजावर, प्रा. शशिकांत हिप्परगी, प्रा. मानसी जाधव, तसेच जीएस, एजीएस, एसएस, सीएस, एलआर, विद्यार्थी अध्यक्ष, विविध सचिव व विद्यार्थी परिषदेच्या सर्व सदस्यांचे विशेष योगदान लाभले.























