मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे मेसेज वाहतूक पोलिसांना प्राप्त झाला आहे. या मेसेजमुळं मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून अधिक तपास सुरू आहे. हा मेसेज कोणी पाठवला हे अद्याप कळू शकलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा एक मेसेज आला आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने नेहमीच शहराला धोका असतो. आतापर्यंत अनेकदा अशा प्रकारचे फोन, मेसेज, इ मेल येतच असतात. नेहमी प्रमाणेच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या असून धमकीचा मेसेज पाठवणार्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.