सोलापूर -प्रज्ञा निकेतन संस्था संचलित एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे स्मॅश वार्षिक क्रीडा महोत्सवास जल्लोषात सुरुवात झाली.
याचे उद्घाटन प्राचार्य डॉ.बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास मेतन, उपप्राचार्य डॉ विनायक पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. क्रीडा मार्गदर्शक प्रा सचिन गायकवाड यांनी खेळाडूना क्रीडा शपथ दिली. यावेळी ट्रेनिंग प्लेसमेंटचे प्रमुख डॉ. आर. आर. पाटील, क्रीडा समन्वयक प्रा. जामदार, प्रा. ऋचा श्रीराम, विभाग प्रमुख प्रा. डॉ. जाधव संतोष, प्रा डॉ. विपुल बाक, प्रा. डॉ सतीश मोरे, प्रा. सूर्याजी काळे, प्रा डॉ मिथुन पाटील, प्रा. एस. एस. धोत्रे, आर अँडडी, डॉ. श्रीकांत जहागिरदार, इन्फ्रा हेड प्रा गिरीश कुलकर्णी, रजिस्टर एस. एस. शेळके, विद्यार्थी क्रीडा सचिव ओम गुंजाळ, सहसचिव प्रतीक डांगे, सौरभ पांढरभिसे, शेजल पवार उपस्थित होते
यावेळी तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आठ खेळ होणार आहेत. 450 विद्यार्थी खेळाडूंनी गणवेशात आपल्या विभागाचा ध्वज घेऊन विभागप्रमुखासह मार्च पास करत अतिथीना मानवंदना दिली. आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी व सहभागी खेळाडूंनी ब्लेझर मध्ये मशाल घेऊन मैदानात दौड करत अतिथीना प्रदान केली. प्रा यू के जाधव यांनी समालोचन केली.
यावेळी फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बास्केटबॉल टग ऑफ वॉर, डॉजबॉल , क्रिकेट या क्रीडा प्रकारात टर्फ ग्राउंड वर मुले व मुलींनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धा पार पडण्यासाठी प्रा. विजय सांगोलगी, प्रा. सालीमठ, प्रा. तेग्यी, प्रा. भुयार, प्रा. नेवाळे, प्रा. धनशेट्टी, प्रमोद लिगाडे, सचिन मोरे, महेश गोटे, रेवण पवार यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे.
























