वेळापूर – जि प शाळा सुमित्रा नगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा यशवंत नगर तर्फे विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेला संविधान उद्देशिका फ्रेम भेट देण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, पट्टी, पेन्सिल तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल, स्केच पेन तसेच सर्वांना लाडू व फरसाण या मिठाईचे वाटप केले.
याप्रसंगी शाळेच्या वतीने नष्टे यांच्या हस्ते सहाय्यक अभियंता सुहास शिंदे, सहाय्यक अभियंता अमोल चंदनशिव , सहाय्यक अभियंता लोखंडे तसेच संपूर्ण कर्मचारी स्टाफ चा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती सुमित्रा नगर शाळेच्या वतीने समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून जिल्हा परिषद शाळेची निवड केली त्याबद्दल विशेषतः त्यांचे शब्दसुमनाने आभारही मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती हिंगमिरे यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्रीमती ताटे यांनी केले व सर्वांचे आभार नष्टे यांनी मांडले .

























