माळशिरस : सोलापूर जनता सहकारी बँक माळशिरस शाखेचा ग्राहक स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी संचालक रवींद्र साळे व भीष्माचार्य कुदळे मधुसुदन दास उपस्थित होते पहिल्यांदा भारतमाता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे परिचय रोहित जोशी यांनी करून दिले.
.यावेळी बोलताना सुनील पेंडसे म्हणाले की सोलापूर जनता बँक हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी १९६३ साली सुरु केली. बँकेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या साठ वर्षांत खातेदार, हितचिंतकांचा अढळ विश्वास बँकेने संपादन केले आहे. त्यानिमित्त ग्राहक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे
संचालक व उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी अनेक सहकारी बँका डबघाईला आल्या असताना सुद्धा जनता सहकारी बँक ही प्रगतीपथावर असून चालू वर्षी सभासदांना नऊ टक्के डिव्हिडंड दिला असुन जनता बँकेच्या स्थापने मागचा उद्देश, बँकेची सद्यस्थिती, व आगामी योजना इ. बद्दलची माहिती दिली.
बँकेने विविध कर्ज योजना, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा, व हिरक महोत्सव वर्षानिमित्त हिरक कर्ज योजना इ. ची माहिती शाखाधिकारी सागर भणगे यांनी करून दिली
ग्राहकांच्या मनोगतात महादेव सपकाळ, गोरख क्षीरसागर व अनिल पाटील यांनी बँकेची तत्पर सेवा, ग्राहकांसोबत कर्मचा-यांचे सुसंवाद, ग्राहक सर्वतोपरी हि भावना संचालक व कर्मचा-यांची असल्याने बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार वाघमोडे,रोहित जोशी,गौरव पंचवाघ,शब्बीर नदाफ,विठ्ठल कुलकर्णी,प्रदीप पंचवाघ व मुकुंद पंचवाघ यांनी परिश्रम घेतले.
























