मराठी सिनेसृष्टी मधील बोल्ड आणि ग्लॅमर्स अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ला ओळखले जाते. सईने मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केलेली. आता ती मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय झाली आहे. त्यामुळेच सईचे चाहते देखील अमाप आहेत. सई सध्या तिच्या श्रीदेवी प्रसन्न या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या एका मुलाखतीतील वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
मराठी सिने सृष्टीत बोल्डनेस साठी सईला ओळखले जाते. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिला होणाऱ्या ट्रॉलिंग वर आपलं मत मांडलं.
या प्रश्नाचे उत्तर देताना सई म्हणाली की, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि स्तुतीसह ट्रोलिंगही या प्रोफेशनचा घट्ट भाग आहे. मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष करावं. एखादी व्यक्ती जेव्हा प्रसिद्ध असते. चार चौकटीच्या बाहेर काम करू पाहते. तेव्हा तिला ट्रोल केलं जातं. कधी-कधी काही करत नाही, म्हणूनही ट्रोल केले जात’.
ट्रोलिंगचा मनावर परिणाम होते. पण, ट्रोलिंगवर आपली एनर्जी खर्च न करणे हाच चांगला उपाय आहे. आम्ही कुणाची तरी बहिण, मुलगी आणि ताई आहोत, हे लोक कमेंट करताना विसरतात. मला असं वाटतं की प्रोफेशमध्ये असताना थोडीशी गेंड्याची कातडी ठेवणं गरजेचं आहे. ट्रोलिंग करुन ते तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर तुम्ही तिकडे दुर्लक्ष करण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही जिंकलात’.
सईच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचा सिद्धार्थ चांदेकरसोबतचा श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता येत्या काळात ती भूमी पेडणेकरसोबत भक्षक या सिनेमात दिसणार आहे. ९ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होत आहे.