सोलापूर – मध्य रेल्वे कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर येथे विशेष गाड्या चालवणार आहे. जेणेकरून प्रवासी वारकऱ्यांची अतिरिक्त गर्दी कमी होईल. यामध्ये मिरज – लातूर अनारक्षित विशेष गाड्यांच्या एकूण २४ फेऱ्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१४४३ मिरज-लातूर अनारक्षित विशेष ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर२०२५ पर्यंत दररोज सकाळी ७ वाजता मिरज येथून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता लातूर येथे पोहोचेल. याच्या ६ फेऱ्या होतील. पंढरपूरमध्ये आगमन १०:१५ ला प्रस्थान १०:२० सकाळी करेल.
गाडी क्रमांक ०१४४४ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज दुपारी ४ वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता मिरजला पोहोचेल. याच्या ६ फेऱ्या होतील पंढरपूरमध्ये आगमन ७:४५, प्रस्थान ७:५० सकाळी होईल.
गाडी क्रमांक ०१४४२ लातूर-मिरज अनारक्षित विशेष गाडी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ६ वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १:५० वाजता मिरजला पोहोचेल. याच्या ६ फेऱ्या होतील. पंढरपूरमध्ये आगमन १०:५५, प्रस्थान ११ सकाळी होईल.
गाडी क्रमांक ०१४४१ मिरज-लातूर अनारक्षित स्पेशल ३० ऑक्टोबर २०२५ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज रात्री १० वाजता मिरजहून सुटेल आणि लातूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० वाजता पोहोचेल. याच्या ६ फेऱ्या होतील. पंढरपूर येथे आगमन ११:५०, प्रस्थान ११:५५ रात्री होईल.
या गाड्यांचे थांबे हे अरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ असे असतील. याची १० सामान्य द्वितीय श्रेणी/स्लीपर श्रेणीचे कोच आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन. १२ अनारक्षित कोच असतील.
सोलापूर मिरज अनारक्षित विशेष १२ फेऱ्या गाड्या धावणार आहेत. यामध्ये ट्रेन क्रमांक ०१४१९ सोलापूर-मिरज अनारक्षित विशेष ३० ऑक्टॉबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ७ वाजता सोलापूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:१० वाजता मिरजला पोहोचेल. या गाडीच्या ६ फेऱ्या होतील.
पंढरपूरला आगमन ०९:२०, प्रस्थान ०९:२५ सकाळी होईल.
ट्रेन क्रमांक ०१४२० मिरज-सोलापूर अनारक्षित विशेष ३० ऑक्टॉबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दररोज दुपारी १२:५० वाजता मिरजहून निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ०७:०० वाजता सोलापूरला पोहोचेल. या गाडीच्या ६ फेऱ्या होतील. पंढरपूरला आगमन २:५० ला, प्रस्थान २:५५ दुपारी होईल.
या गाड्यांचे थांबे मोहोळ, माढा, कुर्डूवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगा4व, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग असे असतील. १६ सामान्य द्वितीय श्रेणी/स्लीपर श्रेणीचे कोच आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन. १८ अनारक्षित कोच अशी रचना असेल.


















