माहूर – राजर्षी शाहू फाउंडेशन, माहूर अंतर्गत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात राजर्षी शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष भाग्यवंत भवरे,सचिव सौ.शितल भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, २० जानेवारी रोजी माजी नगरसेवक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष पत्रकार इलियास बावाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ” विद्यार्थ्यांसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे असून, खेळ हे केवळ मनोरंजन नसून,ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक आहेत, जे त्यांना एक निरोगी, संतुलित आणि यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत करतात! असे मार्गदर्शन उद्घाटनप्रसंगी बावाणी यांनी केले.
माहूर तालुक्यासह राज्यभर गाजलेली शैक्षणिक संस्था राजर्षी शाहू फाउंडेशन अंतर्गत जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. येथील वार्षिक स्नेहसंमेलन विशेष उल्लेखनीय असा असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच शरीर प्रकृती सुदृढ राहावी या हेतूने दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धेचे आयोजन राजर्षी शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष भाग्यवंत भवरे सचिव सौ.शितल भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते.
पुढे बोलताना व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी यांनी “विद्यार्थ्यांसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ते शारीरिक आरोग्य (मजबूत हाडे, फिटनेस), मानसिक विकास (तणावमुक्ती, एकाग्रता, नेतृत्व), सामाजिक कौशल्ये (टीमवर्क, शिस्त), आणि शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करतात, असे मोलाचे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी विद्यार्थी दशेतच कसून सराव करावा, असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख उपस्थितात प्राचार्य संतोष कुमार, उपप्राचार्य अहेफाज शेख, सुधीर गौरखेडे मॅनेजिंग डायरेक्टर, तसेच राजाराम गंदेवाड,धनेश मुनेश्वर, प्रतिभा पाटील, आकाश राठोड, कपिल चव्हाण, नागेश महल्ले, रोशनी राठोड, किरण फड, पल्लवी पाटील, संध्या मॅडम, प्राजक्ता मॅडम, अजय राठोड, वैष्णवी मॅडम, पुनम मॅडम, सोहेल सर यांचे सह शिक्षक, विद्यार्थी व दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरा गोरख जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. पार्थवी गावंडे यांनी केले.























