सोलापूर – अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या समारोप क्रिकेट प्रशिक्षक प्रकाश चंद्रप्पा कंप्पली यांच्या हस्ते झाला.
तत्पूर्वी बॅन्डच्या निनादात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अंजली महावरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. रामकृष्ण पोन्नम यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत संचलन करून शिस्तीचा पाठ दिला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे इ. चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले खेळावरील नृत्य. या नृत्यांनी सर्वांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते विविध खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पदक प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
या क्रीडा सप्ताहात 100 मीटर धावणे, थ्रो बॉल, कबड्डी, क्रिकेट, नेट बाॅल, डाॅच बाॅल यासारखे खेळ घेण्यात आले. त्यात १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील असे दोन गट करण्यात आले होते. या खेळात सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यावर्षीचा बेस्ट हाऊसचा मान ग्रीन हाऊस ने मिळविला.
यावेळी मंचावर डाॅ.अजय पोन्नम सौ. सुलक्षणा पोन्नम, रामकृष्ण पोन्नम, उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख, चन्नेश इंडी, सौ. अर्चना महांकाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान अझहारी यांनी केले. दीपिका टीचर यांनी आभार मानले.

























