सोलापूर – जिल्हा एथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने अंडर 12 वयोगटातील 60 मीटर धावण्याच्या स्पर्धेत9.21 सेकंदाची वेळ नोंदवत चतुरबाई श्राविका विद्यालयातील चि.अंश काटकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशन वतीने कोपरगाव,अहिल्या नगर येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
प्रशिक्षक( विराट स्पोर्ट्स क्लब करियर अकॅडमी, नेहरू नगर )सूर्याजी लिगाडे ,भारती लिगाडे ,साधना काटकर यांचे त्याला बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुपाली चेंडके ,सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थी मित्रानी त्याचे कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





















