बार्शी – स्व. सौ. शोभा सोपल बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री भुषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. सरिता पद्मन (सरिता किचनच्या सर्वेसर्वा) या उपस्थित होत्या. बार्शीमधील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांना स्त्री भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्यामध्ये सौ. सरिता पद्मन, शिक्षण क्षेत्रात अमृता शहा, वीरपत्नी रोहिणी काकडे, ब्रम्हकुमारी संगीतादीदी, आणि कु. सान्वी गोरे हिला महिला राजस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये उज्वल यश मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच महिलाच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी मेहंदी, पाककला आणि वेशभूषण या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
तसेच बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी कार्यक्रमास भेट देवून स्व. सौ. शोभाताई सोपल बहुउद्देशीय संस्था, बार्शी संस्थेच्या सर्व पदाधिकारी, स्पर्धक तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे व प्रेक्षकांचे स्वागत करुन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मेंहदी स्पर्धेसाठी एकुण ३० महिलांनी सहभाग घेतला त्यांमध्ये उत्तेजनार्थ द्वितीय प्रणिता यादव, उत्तेजनार्थ प्रथम शितल गायकवाड, चौथा क्रमांक धनश्री पवार, तीसरा क्रमांक साक्षी वहील, दुसरा क्रमांक वैष्णवी जाधव व प्रथम क्रमांक मधुरा भुमकर यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन मयुरी उबाळे आणि प्रतिक्षा देशमुख यांनी काम पाहिले.
तसेच पाककला या स्पर्धेत एकुण ५२ महिलांनी सहभाग घेतला. उत्तेजनार्थ द्वितीय अनुराधा होतपेट्टी, उत्तेजनार्थ प्रथम वैशाली देशमुख, पाचवा क्रमांक प्रिया रुद्राके, चौथा क्रमांक प्रियंका साखरे, तिसरा क्रमांक शारदा रायचुरकर, दुसरा क्रमांक अंजली कुलकर्णी, प्रथम क्रमांक सिमा कापसे यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन सौ. सरिता पद्मन यांनी काम पाहिले.
तसेज वेशभुषा स्पर्धेसाठी २५ महिलांनी सहभाग घेतला होता. उत्तेजनार्थ द्वितीय कांचन वायचळ, उत्तेजनार्थ प्रथम संतोषी शेवते, तिसरा क्रमांक अमृता खंदारे, दुसरा क्रमांक तनुजा तुपेरे, प्रथम क्रमांक अनुराधा होतपेट्टी यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन निलम अग्रवाल व कोमल कदम यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना सौ. उज्वला सोपल म्हणाल्या या संस्थेने महिलांसाठी आजपर्यंत आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक शालेय वस्तु वाटप केले आहे. वृक्षा रोपन केलेले आहे तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आजचा काळ बदलला आहे आता मुलीच्या जन्माचेही स्वागत केले जाते. मुलींवर चांगले संस्कार करुन स्वत: पायावर उभा करा असे त्यांनी सांगीतले.
यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
























