सांगोला – नाझरे ता.सांगोला येथे सध्या महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे. परंतु या स्मार्ट मीटर मधून अधिक वीज बिल येत असल्याची अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचा यास विरोध असून मीटर बसू नये असे निवेदन नाझरे महावितरण कार्यालयास देण्यात आले आहे.
स्मार्ट मीटर एका कंपनीमार्फत बसविले जात असून हे मीटर वेगाने फिरत आहे व भविष्यात रिचार्ज सिस्टीमचे होणार आहे. तरी महावितरण कार्यालयाने जबरदस्तीने हे मीटर बसवू नयेत असे सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय सरगर यांनी तर स्मार्ट मीटर बसवण्यास सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे व तसा ठराव ग्रामपंचायत झाला आहे तरीही मीटर बसविल्यास तीव्र आंदोलन करू असे सामाजिक कार्यकर्ते दादासो हरिहर यांनी सांगितले.
वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार स्मार्ट विविध मीटर लावणे बंधनकारक नाही व भविष्यातील लूटमार थांबविण्यासाठी जनतेने याला तीव्र विरोध करावा असे आवाहन रविराज शेटे यांनी केले आहे.


























