पारध – विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ज्ञानप्राप्ती बरोबर जीवनामध्ये एक तरी कला जोपासावी आणि आपल्या स्वतःच्या जीवनाबरोबर समाजाचेही जीवन सुंदर करावे असे प्रतिपादन अजिंठा केळणा शिक्षण संस्थेचे सचिव उदयसिंग लोखंडे यांनी भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालय पारध येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले, यावेळी प्रा. संग्रामराजे देशमुख यांनी पारधच्या नाट्य भूमीची परंपरा कायम ठेवण्यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालय घेत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले, यावेळी महर्षी पाराशर ऋषी इंग्लिश स्कूल, राजर्षी शाहू विद्यालय, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय,राजर्षी शाहू महाविद्यालय, गायत्री डी फॉर्म महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांच्या बक्षीस वितरण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. सुगदेव मांटे, अध्यक्ष रेवती ताई मांटे, गायत्री मांटे, मिताली मांटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रो. डॉ. मांटे यांनी पारध येथील नाट्यभूमीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल याची ग्वाही दिली, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल, आरती लोखंडे, प्रा.अनिल मगर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यय स्थानी प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे होते, त्यांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची आवाहन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास लोखंडे यांनी, तर अहवाल वाचन प्राचार्य अमोल लोखंडे यांनी केले, आणि आभार प्रदर्शन प्रा. अमोल बांडगे यांनी मांडले, यावेळी मंचावर गायत्री डी फार्मसी प्राचार्य विवेक सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, यांची विशेष उपस्थिती होती, या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले, या कार्यक्रमासाठी गावकरी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















