अक्कलकोट – तालुकास्तरीय किशोरी मेळाव्यात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोरी उमरगे येथील वर्षा बिराजदार पोस्टर्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर रंगभरण या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्याने गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे विस्तार अधिकारी स्वामी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही (बालिका दिन )तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन जेऊर येथे केले होते. तालुक्यातील किशोरींचा सहभाग असून तालुकास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे येथील नवोपक्रमशील विद्यार्थीप्रिय शिक्षिका श्रीमती रिंकू अनंतराव जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीच्या वर्गातील वर्षा बिराजदार हिने पोस्टर्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर रंगभरण या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला याप्रसंगी मैंदर्गी केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सर्व बालिका व अन्य मान्यवर उपस्थित होते .

























