पिलीव – पंढरपूर कोर्टी येथील सिंहगड इंजिनियर काॅलेजचा बि ई अभियाञीकी मेकॅनिकल इंजिनियर तिसऱ्या वर्षात शिकणारा स्वप्नील दादासाहेब मदने याने 80.20(9.45 cgpa) गुण मिळवित सोलापूर विद्यापीठात दहावा क्रमांक मिळविला याला विभागप्रमुख श्याम कुलकर्णी, प्राचार्य के .जे कारंडे, प्रा.एस एस साळुंखे, प्रा पवार, ठिगळे, बोले सर, कोळी सर, घोडके मॅडम, जाधव सर, कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले .स्वप्नील हा पिलीव येथील पञकार संजय पाटील यांचा पुतण्या आहे.
स्वप्नीलच्या ह्या यशाबद्दल पिलीव परीसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.




















