पंढरपूर – नववर्षाचे औचित्य साधून स्वरसुधा, पंढरपूर यांचे वतीने ‘छोटे उस्ताद मी होणार सुपरस्टार फेम’ गायक राजयोग धुरी यांचा बहारदार गीतांची मेजवानी शनिवार दि.३ जोनवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आरती प्रांगण, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे विनामूल्य आयोजीत केला आहे, त्याचा लाभ सर्व पंढरपूरकरातील रसिकांनी घ्यावा असे आवाहन युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारक यांनी केले आहे.
गायक राजयोग धुरी सुपरस्टार छोटे उस्ताद या रिॲलिटी शो मधील विजेता असून मोस्ट वोटेड पॉप्युलर सिंगर ऑफ महाराष्ट्र असा किताब त्याला यापुर्वी प्राप्त झाला आहे. सध्या त्याचे शास्त्रीय नाट्य संगीताचे अनेक रिल प्रसिध्द असून लोक त्याचे गाण्याला पसंती देत आहेत.
सदर कार्यक्रम हा माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे उपस्थित होणार असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरसुधा संस्थेचे ज्ञानेश्वर दुधाणे, डॉ.श्री.प्रसाद कुलकर्णी हे परिश्रम घेत आहेत.



















