सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची बातमी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आज शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या विशेष बैठकीत दोन्ही पदांसाठी विरोधकांनी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवड जाहीर होताच सभागृहात अभिनंदनाचा जल्लोष पाहायला मिळाला.
शहराच्या प्रथम नागरिकपदी विनायक कोंड्याल यांची निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. तरुण भारतच्या अचूक राजकीय अंदाजाची पुन्हा एकदा प्रचिती यानिमित्ताने आली आहे.

























