भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर येथे रिसर्च व्हॉल्यूम चे प्रकाशन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथील मुख्य संशोधक डॉ. संग्राम धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. इन्स्टिट्यूट मधील स्टाफ मेंबर्सनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये लिहिलेल्ले शोधनिबंध एकत्र करून त्याचे रिसर्च व्हॉल्यूम स्वरूपात करण्यात आले आहे. या रिसर्च व्हॉल्यूमचे प्रकाशन डॉ. धुमाळ सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस बी सावंत यांनी भारती विद्यापीठाची तसेच इन्स्टिट्यूटची माहिती दिली व हे रिसर्च व्हॉल्यूम तयार करण्यामागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुणे डॉ. धुमाळ यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी समाजात वावरताना विविध अडचणी दिसून येतात त्या अडचणींवर संशोधन करून त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. शिक्षकांना समाजामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. पिढी घडवण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांनी ज्ञानार्जन करताना विविध विषयावर संशोधन करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले. आभार प्रदर्शन एम. बी. ए. विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी एम. सी. ए. विभाग प्रमुख डॉ. एम. के. पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.