कंधार/ता. प्रतिनिधी
महाराष्ट्र व परराज्यातील हिंदू मुस्लिम यांचे श्रद्धास्थान असलेल्या सूफी संत हजरत सय्यद शेख अली सांगडे सुल्तान मुश्किले आसान रय. अ. यांचा ५९० वा उरूस महोत्सव अनेक वर्षापासून पारंपरिक सदभावना आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सय्यद शाह अनवारुल्लाह हुसैनी रफाई कादरी सज्जादा नशीन व मुतवल्ली दर्गाह हजरत सांगडे सुल्तान मुश्किले आसान रय. अ. कंधार यांचे वंशज यांनी दैनिक गावकरी शी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना सय्यद शाह अनबारुल्लाह हुसैनी म्हणाले की,
हिंदू-मुस्लिम यांचे श्रद्धास्थान असलेले प्रेम, शांती आणि बंधूत्व शिकविणारे महान सूफी संत हजरत सय्यद शेख सांगडे सुल्तान मुश्किले आसान र. अ. याचा उरुस दि.१४ अगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संदल मिरवणूक दर्गाह मधून निघेल व रात्री १०.०० वाजता दर्गाह परिसरात सूफी संत यांच्या महान कार्या वर प्रबोधनात्मक कार्यक्रम दि. १५ अगस्ट २०२४ रोजी सकाळी ७ ते १० बाजेपर्यंत फातेहा का प्रसाद व भोजन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भाविकांना सांगण्यात आले व सायंकाळी चिरागां चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून
दि. १६ अगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता हजरत सय्यद शाह अजीमोद्दीन (शाह धड़क) र. अ. आणि स. शाह मोईनोद्दीन (शाह कडक) र. अ. कंधार यांचा संदल व रात्री प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी सूफी संत हजरत सय्यद शेख सांगडे सुल्तान मुश्किले आसान त्यांचा ५९० या उरूस महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी गर्दी न करता शिस्तीने सूफी संत यांचे दर्शन घते बेळेस कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी प्रत्येक भाविकांनी घेण्यात यावी व आपल्याघरी सुखरूप जावे हीच सद्भावना त्यांनी व्यक्त केली.
कंधार शहरातील जगतुंग तलावात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने आपला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा पण तळ्याकाठच्या जवळ असल्याने भाविकांना कळविण्यात येते की जगतुंग तलावाकडे आपले नातेवाईक मुले बाळ यांना तलावाकडे जाऊ देऊ नये असे सय्यद शाह अनवारुल्लाह हुसैनी रफाई कादरी सज्जादा नशीन व मुतवल्ली दर्गाह हजरत सय्यद शेख सांगडे सुल्तान मुश्किले आसान यांचे वंशज यांनी आवाहन केले आहे.