अक्कलकोट – शहरातील अभिनंदन प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात साजरी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे , चपळगाव च्या सरपंच वर्षा भंडारकवठे , सेवानिवृत्त गट विकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले ,अमर पाटील , पांडुरंग पाटील , अरिंजय गांधी , माजी मुख्याध्यापक बी जी शिंदे , सुखदा गांधी , अभिनंदन गांधी , राहुल गांधी , केतकी गांधी , संजना गांधी , अरविंद शिंदे , मुख्याध्यापिका श्रीदेवी शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अभिनंदन प्री स्कूल मधील चिमुकल्याने विविध मराठी , हिंदी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीदेवी शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी शिरसाट ,अश्विनी महिंद्रकर , प्रियांका बिराजदार ,गायत्री स्वामी , स्नेहा लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमास साधना मोरे , चौडेश्वरी बबलाद ,मंजिरी बाग ,पत्रकार स्वामीराव गायकवाड ,डॉक्टर आदित्य कोतवाल ,किशोर महिंद्रकर , छकडे , मेनगले , कुंभार , वाकडे , जकापुरे , भास्कर , भस्मे ,मलगोंडा , जमगे , शेख , जाधव , स्वप्निल बिराजदार ,अमर स्वामी , माने , सेन , गवळी, मठपती , चव्हाण , पाटील , डिग्गे , सोडे आदिसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























