मंगळवेढा ः- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा।स्व।अजितदादा पवारसाहेब यांचे आज सकाळी ८।४५ चे दरम्यान बारामती येथील विमानतळावर विमान अपघातामुळे दुर्दैवी व दुःखद निधन झाले। त्यांच्या आत्म्यास शांती मिळणेसाठी श्री संत दामाजी साखरी साखर कारखाना कार्यस्थळावर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते।
सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील म्हणाले, आदरणीय अजितदादा पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधनाने आज आपल्या महाराष्ट्र राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। करारी नेत्रत्व। विकासाची दुरदृष्टी लाभलेला उत्तम प्रशासक आपलेतुन हरपलेला आहे। महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मागील पंचवीस ते तीस वर्षाचे मोलाचे योगदान अजितदादा यांनी दिलेले आहे। असा हा महाराष्ट्राचा झंझावात काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्यात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालेली आहे। त्यांच्या कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी अशी श्री संत दामाजी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी व तालुक्यातील सर्व जनतेच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली।
याप्रसंगी श्रध्दांजली वाहताना कारखान्याचे संचालक श्री।औदुंबर वाडदेकर यांनी घडयाळाच्या काटयाप्रमाणे अहोरात्र काम करणारा नेता आपल्यातून हरवल्याचे सांगितले। कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री।भारत बेदरे यांनी वेळेत काम करणारा नेत्यास आपण मुकलो असलेचे सांगून त्यांच्या अकाली निधनाने राज्याचे तसेच पक्षाचे अपरिमित नुकसान झाल्याचे सांगितले। कारखान्याचे संचालक श्री।दिगंबर भाकरे यांनी स्व।अजितदादांना श्रध्दांजली वाहताना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून काम करणारा नेता आपल्यातून गेल्याचे सांगून दादांनी सहकार क्षेत्रात दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल असे सांगितले।
कारखान्याचे संचालक श्री।राजेंद्र चरणुकाका पाटील यांनी सर्वसामान्य शेतकरी तसेच गोरगरीब जनतेसाठी मदत करण्याचे काम स्व।अजितदादांनी सदैव केलेचे सांगून आपल्या दामाजी सहकारी साखर कारखान्यास त्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीचा आवर्जुन उल्लेख केला।
सदर प्रसंगी व्हाईस चेअरमन श्री।तानाजी खरात,संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे,रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,प्र।कार्यकारी संचालक श्री।रमेश जायभाय, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी,कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी, परिसरातील सभासद शेतकरी उपस्थित होते।


















