पिलीव – येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची 96 वी पुण्यतिथी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे वरीष्ठ लेखनिक तुकाराम भोरकडे सर याच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळेस शेगर सर,जमदाडे सर, देवकर मॅडम यांनी लक्ष्मीबाई पाटील याच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.तर वाघमारे सर ,झाडे सर यानी वहीनिषयी कवीता व गितगायन केले.यावेळेस शालेय पोषण आहार प्रमुख ढोले सर व जाधव सर यांनी मुलांना गोड खाऊ वाटप केले .
यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बागल सर, शाळा व्यवस्थापन समीतीचे सदस्य संजय पाटील सर, उपस्थित होते.सदरच्या कार्यक्रमाचे सुञसंचालन जमदाडे सर यांनी तर आभार शेगर सर यांनी मानले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन करताना.






















