पारध – भोकरदन तालुक्यातील पारध “महाराष्ट्रात विकासाचं मॉडेल म्हणलं की बारामतीचं नाव घेतलं जातं… कारण तिथे दादांचा स्पर्श आहे, कष्ट आहेत आणि जनतेसाठी झटलेलं आयुष्य आहे…” अशा शब्दांत महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते तथा विकासपुरुष अजितदादा पवार यांना पारध येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दादांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून पारध नगरीतही हळहळ व्यक्त करण्यात आली. “दादा स्वर्गात गेले असले, तरी ते स्वर्गालाही बारामतीसारखं घडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त करत वातावरण भारावून गेले.
या शोकसभेला सर्वपक्षीय नेते, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दादांनी केलेल्या विकासकामांची, निर्णयक्षम नेतृत्वाची आणि जनतेसाठी अखंड झटणाऱ्या स्वभावाची आठवण काढताना अनेकांचे डोळे पाणावले.
यावेळी पारध पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक संतोष माने, परमेश्वर पाटील लोखंडे, मनीष श्रीवास्तव, संग्राम राजे देशमुख, ,गणेश पाटील लोखंडे, ,अशोक पाटील लोखंडे, समाधान लोखंडे, उदयसिंह लोखंडे, नरेंद्र श्रीवास्तव, बाबासाहेब देशमुख, सलीम पठाण, गजानन पाखरे,अजहर पठाण, किरण श्रीवास्तव, राजू अण्णा पाखरे, संजीवन लोखंडे, संतोष पाखरे, विकास लोखंडे, सागर देशमुख, श्याम देशमुख, संजय कातोरे, सुरेश अल्हाट संजय देशमुख, सुनील बेेराड, अक्षय वाकेकर ,सखाराम लोखंडे, ज्ञानेश्वर लक्कस ,पत्रकार कैलास दांडगे रामसिंग ठाकूर रवींद्र लोखंडे समाधान तेलंग्रे गजानन देशमुख रमेश जाधव शकील भाई, तेजराव दांडगे, कृष्णा लोखंडे, यांच्यासह भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दादांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “सत्ता आली तरी अहंकार नाही आणि अडचण आली तरी माघार नाही, अशी दादांची कार्यशैली होती. त्यांनी बारामतीला विकासाचं मॉडेल बनवलं. असा झुंजार नेता पुन्हा होणं कठीण आहे.”
शोकसभेच्या शेवटी दोन मिनिटे मौन पाळून दादांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
सागर देशमुख (सामाजिक कार्यकर्ते)
“महाराष्ट्राचा लाडका नेता आणि विकासाचे शिल्पकार अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायक घटना आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राने एक कणखर, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले आहे,” अशी भावना सागर देशमुख यांनी व्यक्त केली.



















