Tuesday, February 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सासऱ्याची कोट्यावधीची संपत्ती, ती हडपण्यासाठी सुनेनेच दिली सुपारी, नेमका कसा रचला हत्येचा कट?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 9, 2024
in crime
0
सासऱ्याची कोट्यावधीची संपत्ती, ती हडपण्यासाठी सुनेनेच दिली सुपारी, नेमका कसा रचला हत्येचा कट?
0
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून ती हडपण्यासाठी गडचिरोलीत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिने स्वत:च्या सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली होती. अर्चना पुट्टेवार (रा.मानेवाडा, नागपूर) असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या गडचिरोलीत नगर रचना विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. सुरूवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाला दोन आठवड्यानंतर वाचा फुटली आणि सुपारी देऊन हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणात महिला अधिकारी अर्चना पुट्टेवार हिच्यासह तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

अर्चना पुट्टेवार हिचे सासरे पुरूषोत्तम पुट्टेवार (८२ वर्ष) रा.शुभनगर (मानेवाडा, नागपूर) यांचा गेल्या २२ मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे दवाखान्यातून ते मुलीच्या घरी जात असताना एका कारने त्यांना धडक दिली. दरम्यान पुरूषोत्तम पुट्टेवार यांच्या चुलत भावाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची हत्या झाल्याची भिती व्यक्त केली. नागपूरचे पोलिस आयुक्त डॅा.रविंद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला त्यादृष्टीने तपास करण्याचे निर्देश दिले. नागपूर शहर पोलिसांच्या युनिट-४ ने केलेल्या चौकशीत घरातील कार चालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळून आली. चौकशीत सचिन धार्मिक आणि नीरज निमजे यांची नावे समोर आली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून नीरजने पुट्टेवार यांची हत्या केल्याचे सांगितले. यासोबतच सार्थकला बोलते केल्यानंतर त्याने अर्चना पुट्टेवार यांच्या सांगण्यावरून हा हत्येचा कट रचल्याचे कबूल केले.

 

असा रचला हत्येचा कट

गडचिरोलीत नोकरी करत असलेल्या पण मूळच्या नागपूर येथील असलेल्या अर्चना पुट्टेवारला ड्रायव्हरची आवश्यकता होती. तिची ओळख सचिन धार्मिक याच्यासोबत झाली. सचिनचे वडील चालवत असलेल्या भिसीची ती सदस्य होती. सचिनने त्याचा मित्र सार्थक बागडे याचे ड्रायव्हर म्हणून नाव सुचविले. यादरम्यान अर्चनाने सचिन याला आपले सासरे पुरूषोत्तम पुट्टेवार यांना संपविण्याची सुपारी दिली. याप्रकरणात आपले किंवा ड्रायव्हर सार्थक याचे नाव समोर यायला नको असे बजावले होते. त्यानुसार कट रचून एक जुनी कार खरेदी करण्यात आली. अपघात घडवून आणण्यासाठी निरज निमजे याची मदत घेण्यात आली. त्यासाठी नीरजला १ लाख ६० हजार रुपये मिळाले. प्लॅन ठरल्यानंतर २२ मे रोजी निरजने ती जुनी कार चालवली. सोबत सार्थकही त्या कारमध्ये होता. सचिन धार्मिक हा बाईकने पुट्टेवार यांच्या ई-रिक्षाचा पाठलाग करत होता. ते रिक्षातून खाली उतरताच नीरजने त्यांना कारने उडविले. हा एक अपघात आहे असा बनाव करण्यात आला.

 

लोभी अर्चनाच्या कमाईला भ्रष्टाचाराची किनार?

गडचिरोलीत अर्चना पुट्टेवार नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहे. तिच्या सासऱ्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी तिने खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने तिच्या लोभी स्वभावाची ओळख पुढे आली आहे. त्यामुळे गडचिरोलीत नगर रचना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या नवीन ले-आऊटसह अनेक कामांच्या मंजुरीसाठी तिने मोठी कमाई केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी केल्यास काही नियमबाह्य करामती पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय त्यांच्या कमाईची चौकशी करण्याचीही मागणी केली जात आहे.

Post Views: 8
Previous Post

अब्दुल सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार; पराभवानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया

Next Post

सोलापुरात पोलिसाचा दणका ! राम सातपुते यांना शिवीगाळ करणाऱ्या मुस्लिम युवकाने मागितली माफी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापुरात पोलिसाचा दणका ! राम सातपुते यांना शिवीगाळ करणाऱ्या मुस्लिम युवकाने मागितली माफी

सोलापुरात पोलिसाचा दणका ! राम सातपुते यांना शिवीगाळ करणाऱ्या मुस्लिम युवकाने मागितली माफी

ताज्या बातम्या

जिल्हा व सत्र न्यायालयासाठी मूलभूत सुविधांबाबत वकील संघ – नगराध्यक्षा चर्चा

February 2, 2026

मुलांना आपल्या आवडीनुसार करिअर करु द्यावे – सहाय्यक समाजकल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे

February 2, 2026

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–१, पशुपालकांची मोठी गैरसोय

February 2, 2026

पुरोगामी अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड

February 2, 2026

भरधाव केटीसी ट्रकची मालवाडा घाटात दुचाकीला धडक

February 2, 2026

डॉ. बी. आर.कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्रदान

February 2, 2026

धाडी पौर्णिमेच्या भक्तिभावात प्रत्येकमंदिरात विधिपूर्वक धनपूजा#public #maharashtranews #marathinews

February 2, 2026

बुद्धिबळ स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा सावरकर नगर इस्लामपूर येथील प्रथम मुलींनी क्रमांक पटकावला.#public

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0653980

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697