मतदारसंघातील तुम्हा सर्वांचा माझ्यावरचा प्रचंड विश्वास व प्रेमामुळेच मला समाजसेवेसाठी अधिक बळ मिळते : सौ.आशाताई शिंदे
आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापच्या वतीने मतदारसंघात मोठे शक्ती प्रदर्शन
कंधार: प्रतिनिधी;
शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस दि. 20 जुलै रोजी लोहा कंधार मतदारसंघात शेकापच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला, काल सकाळी नांदेड येथील आमदार शिंदे यांच्या स्मेरा निवासस्थाना वरून कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढून पाचलेगावकर महाराज आश्रम येथे आशाताई यांनी दर्शन घेऊन ढवळे कॉर्नर, मारतळा, शिराढोण, उस्माननगर, भोपाळवाडी, पानभोसी, धावरी, रायवाडी, लोहा येथे शेकापच्या कार्यकर्त्यांनी आशाताईंना क्रेनच्या सहायाह्याने भव्य पुष्पहार घालून ते घालून, पुष्पवृष्टी व फटाक्यांची भव्य आतिषबाजी करून आशाताई शिंदे यांचा वाढदिवस मतदार संघात उत्साहात साजरा करण्यात आला,
यावेळी आशाताई यांनी लोहा व कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाराणा प्रताप सिंह महाराज, हाजी सयाह दर्गा येथे जाऊन अभिवादन केले, शेकापच्या वतीने मतदारसंघात शेकाप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण सह विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह. भ. प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमासह आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर भवानीनगर कंधार येथे हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शेकापचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत पाटील शिंदे ,सौ. अनुजाताई विक्रांत पाटील शिंदे यांनी ह .भ .प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाबद्दल गौरवोद्गार काढून शिवलीला ताई पाटील यांचा भव्य सत्कार केला,
यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, माझ्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे तळमळीने केली असून दोन हजार कोटींचे सिंचन तलावाला मंजुरी मिळवून घेतली आहे, माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार शिंदे यांनी दिली.वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, माझे वडील शांतिदूत कै. गोविंदराव पाटील चिखलीकर हे वारकरी संप्रदायाचे होते मला लहानपणापासूनच विठ्ठलाची सेवा करण्याचे भाग्य लाभले असून मुंबई येथील माझे आलिशान लक्झरी जीवन सोडून मला विठ्ठल पांडुरंगाने लोहा-कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी पाठवले असून येणारी विधानसभा मी शंभर टक्के महाविकास आघाडीकडून लढवणार असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूल थापावर विश्वास ठेवू नये,
मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेच माझ्यावर अफाट प्रेम व विश्वास असल्यामुळेच मला सर्वसामान्य लोकांच्या अडीअचणी 18- 18 तास समाजसेवा करण्यासाठी बळ मिळते, तुमच्या सर्वांच्या अफाट प्रेमाच्या व विश्वासाच्या बळावर मी लोहा विधानसभा निवडणूक सर्व ताकतीनिशी लढवणार असून माझा प्रतिस्पर्धी उमेदवार कोणीही असला तरी मला त्याची कसलीच पर्वा नसल्याचे आशाताई शिंदे म्हणाल्या यावेळी आशाताई शिंदे, आमदार शिंदे, सभापती विक्रांत पाटील शिंदे, अनुजाताई शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थिती येथील बोरी खु. येथील कै.गोपीनाथ मुंडे बचत गट पॅकिंग मशीन भेट देण्यात आली,
यावेळी लोहा कंधार मतदारसंघा सह नांदेड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रातील व प्रशासकीय अधिकारी शालेय विद्यार्थी व मतदार संघातील सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.लोहा कंधार मतदारसंघात शेकापच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमासह भव्य रॅली, बॅनरबाजी, पुष्पवृष्टी, फटाक्यांची भव्य आतिषबाजी करून शेकापच्या वतीने आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठे शक्तिप्रदर्शन मतदारसंघात केले होते.