लोहा – कृर्षी उत्पादन बाजार समितीने ज्या व्यापाऱ्याला मोंढा परिसरात दुकान नाही.अशा व्यापाऱ्याला कृउबा समितीने ठराव घेऊन मोकळी जागा देण्याचे ठरले.त्या व्यापाऱ्यांनी टिन पञा शेडचे दुकान तयार करुन व्यवसाय करावा असा निर्णय झाला .
जागा घेतलेल्या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने दुकाने तयार करुन घ्यावेत असेही पण या प्रकारातुन संचालकात व उपसभापती यांच्यात वादाची ठिणगी पेटली हा प्रकार चौराहाट्यावर आले.या प्रकरणाला लक्लिनचीट नाही पण अधिकाऱ्यांवर गंडातर येऊ शकते अशी मोंढा परिसरात चर्चा ऐकायला मिळत आहे.
कृर्षी उत्पादन बाजार समितीमध्ये अनेक वर्षे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताब्यात होती यांना हाटवण्यासाठी माजी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सध्या नगर पालिकेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी सर्वांचे एकजुट करुन निवडनूक पॉनल तयार केले त्या पॉनलला भरघोस यश मिळाले.या प्रचार पॉनल मध्ये माजी आ.रोहिदास चव्हान,माजी आ.श्यामसुंदर शिंदे,माजी आ.मोहन आण्णा हांबर्डे, प्रा मनोहर धोंडे,माजी आ.शंकर आण्णा धोंडगे,सतिश उमरेकर यांनी एकजूट दाखवून बाजार समितीवर आपली सत्ता काबिज केली. विक्रांत शिंदे हेच सभापती होणार हे सर्वनुमते ठरले पण उपसभपती निवडीत चुरस निर्माण झाली.मोहन आण्ण हांबर्डे यांच्याकडुन दत्ता दिघे कारेगावकरसह अनेक जन आपले पारडे जड करण्यासाठी अनेकांची भेट घेऊन नशिब आजमित होते.माजी कॉग्रेस तालुका अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या कोठ्यातुन आण्णा पाटील पवार यांच्या नावाला हिरवा कंदील मिळवून देत होते, कारण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व आमर राजुरकर यांचे विश्वासू शरद पवार मानले जात होते त्यांच्या पक्ष कामाची नोंद घेतली जात होती आणि कॉग्रेसचे जास्त संचालक निवडुन आले होते.
अखेर अण्णा पवार यांना हिरवा कंदील मिळाला आण्णा पवार यांना उपसभापती पद निश्चीत मानले जात होते, पण प्रत्येकाला संधी मिळावी म्हणुन एक ..एक वर्षे उपसभापतीचा कार्येकाळ ठेवला होता. पक्ष आहे त्याच ठिकाणी राहिला नेते आणि पदाधिकारी, संचालक आपोआप संत्तार झाले माजी आ.मोहन आण्णा हांबर्डे,शरद पवार,आण्णा पवार,काही संचालक कॉग्रेस सोडुन आ.प्रताप पाटील चिखलीकर गटात दाखल झाले उपसभापती पदावरील व्यक्तीला अधिकचा कार्येकाळ मिळला.आण्णा पवार उपसभापती पद सोडण्याची तयारी दाखवत नसल्याने अनेक संचालकात नाराजी पसरल्याने गैरप्रकाराचे गाठोडे बाहेर येत आहेत.
उपसभापतीच्या मनमानी गैरकारभारा बदल संचालकात धुसफुस सुरु झाली.
या कार्यालयातील शासनाचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी बरोबर अप्रतेक्ष वाटा ठेवतो. हि बाब अनेक संचालकाला खटकली.
कृउबा समितीच्या मोकळ्या जागेवर दुकाने बाधंण्या करीता किंव्हा जागेची विल्हेवाट लावण्याकरीता वरिष्ठाची मानेता घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत दुकाने तयार केल्यावर कागदी ताळमेळाचा खेळ सुरु झाला.
दुकान तयार करताना जाहिर प्रगटन देणे बंधनकारक आहे.हि प्रकिया गुपचुप केली बाजार पेठेत आजही 40 ते 50 व्यापारी भाड्याच्या दुकानात व्यापार करतात हि सत्तेता आहे ह्या प्रकरणाला क्लिनचीट नाही पण व्यापारी, संचालक, शेतकऱ्यांत चर्चा माञ वेगळी ऐकायला मिळत आहे.



















