तभा फ्लॅश न्यूज/पुणे : दोन दिवसांपासून 8 जिल्ह्यात संततधार सुरू असून, हवामान खात्याने येथे दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ओढे-नद्या दुथडी भरून वाहत असून, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चासकमान धरण 90% भरल्याने त्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. 3552 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे. जळगावमधील हतनूर धरणाचेही सहा दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदीत 8405 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा मिळाल्याने सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नदीला पूर आल्याने किनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.