माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे १० ते १२ आमदार देखील भाजपात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. परिणामी महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान काल त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिल्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर चव्हाण लवकरच भाजपाचे कमळ हाती घेणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...