Wednesday, March 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी चौकशीच्या हालचाली, ठाकरे गटाने थेट शाहांवर आरोप असलेलं प्रकरण उकरलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 12, 2023
in maharashtra
0
दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी चौकशीच्या हालचाली, ठाकरे गटाने थेट शाहांवर आरोप असलेलं प्रकरण उकरलं
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील सत्ताधारी आमदारांकडून दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणाचीही एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

 

 

उपराजधानीत न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची एसआयटी लावावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून सातत्याने दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटीद्वारे चौकशीची मागणी होत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत. त्यात काहीही आढळलेले नाही. दिशा सॅलियन यांच्या कुटुंबीयांचीदेखील काही तक्रार नाही. चौकशीच करायची असेल तर नागपूरात न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्याही कुटुंबीयांची या प्रकरणात काही तक्रार नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूची एसआयटी करून सत्य बाहेर यावे, असे अंबादास दानवे म्हणाले.

 

 

 

अडीच वर्षात तुम्ही काय केले?

दिशा सॅलियनप्रकरणी सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे तुमची सत्ता होती. तेव्हा तुम्ही न्यायमूर्ती लोया प्रकरणी एसआयटी का लावली नाही, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या घरी झालेल्या पार्टीची माहिती अनिल परब यांनी दिली होती. तसेच या प्रकरणी मी जे आरोप करतोय, त्यावरील चौकशीसाठी मलादेखील बोलवावे. जेणेकरून दुधका दुध और पानीका पानी होईल, असेदेखील आमदार नितेश राणे म्हणाले.

 

 

मुंबई महापालिकेवरील चौकशी राजकीय दृष्टीतून: सचिन अहिर

नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षातील अर्थिक व्यवहारांची चौकशी लावणे दुर्दैवी आहे. त्या २५ वर्षांतील २० वर्षे जे आमच्यासोबत होते, तेच आता चौकशीवर चर्चा करताहेत. आगामी निवडणुका लक्षात ठेवून ही चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई राजकीय दृष्टीकोनातून आहे, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे. त्याची साधी कॅगद्वारे पण चौकशी होत नाहीये. एकीकडे इतर महापालिकेतील भ्रष्टाचारावर कॅगची चौकशी करू द्यायची नाही आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेची चौकशी करायची, असा प्रकार सुरू आहे. ज्या आयुक्तांच्या कार्यकाळात या सर्व गोष्टी झाल्यात त्यांनाच प्रशासक म्हणून ठेवायचे. पाहिजे त्या गोष्टी करून घ्यायच्या. असलेल्या ठेवीतून शहर स्वच्छ करत असल्याचे दाखवायचे, असा प्रकार सुरू आहे, असे आमदार सचिन अहिर म्हणाले.

Post Views: 98
Previous Post

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मुंडे भगिनीनी प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेतलं

Next Post

मराठा आरक्षणाचा सर्व्हे गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही: बालाजी किल्लारीकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठा आरक्षणाचा सर्व्हे गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही: बालाजी किल्लारीकर

मराठा आरक्षणाचा सर्व्हे गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही: बालाजी किल्लारीकर

ताज्या बातम्या

विक्रमसिंह शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊचे वाटप. #viral #public

March 3, 2026

सार्थक नरुटे याचे सैनिक स्कूल परीक्षेत यश.. #success

March 3, 2026

भारत -अमेरिका व्यापार कराराची होळी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने.. #public #solapurnews #congress

March 3, 2026

आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश ४ लाख ४५ हजार रुपयांच्या मोटारसायकली हस्तगत. #public #robbery

March 3, 2026

नूतन महापौरांचा श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कार. #public #marathinews #viral #maharashtranews

March 3, 2026

बंजारा समाजाच्या धुंड ची अनोखी परंपरा , महिला करतात हंड्याचे रक्षण. #banjara #holi

March 3, 2026

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले गारपीटीचे अनुदान. #public #viral

March 3, 2026

सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची अनोख्या पद्धतीची होळी साजरा.

March 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0714167

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697