हदगाव / नांदेड – सरपंच संघटना हदगाव यांनी वेळोवेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी.नांदेड यांना पत्रव्यवहार करून घरकुलाचे हप्ते मिळत नाहीत तसेच एमआरजीएस च्या माध्यमातून विहिरी बंदिस्त, नाली, सीसी रोड इत्यादी कामे दोन वर्षापासून सरपंचांनी आपल्या गावात मूलभूत सुविधा देण्यासाठी कामे केली आहेत पण दोन वर्षापासून कुशल बिल मिळत नाही.
पंचवीस पंधरा ची कामे, गावातील नळ जोडणी, ग्रामपंचायत चे १५ व्या वित्त आयोगाचे हप्ते जमा होत नाहीत. जनसुविधाचे कामे करून सुद्धा दहा महिने झाले त्यांचे बिल मिळत नाहीत. सरपंच सदस्याचे पाच वर्षापासून मानधन मिळत नाही, मीटिंगचे भत्ता आज पर्यंत दिला गेला नाही तसेच कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत फक्त वेळ काढूपणा करत आहेत अशा अनेक अडचणीला सरपंच संघटना व्यथा सांगून प्रत्येक कार्यालयाला चकरा मारून मारून सरपंच संघटना थकली आहे लोकप्रतिनिधी सुद्धा या बाबीकडे लक्ष देत नसल्यामुळे आता हीच वेळ आली आहे त्यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी गत शासनाची व प्रशासनाची झालेली आहे त्यामुळे लवकरच पंचायत समिती कार्यालयाला कुलूप लावण्याचे ठरवले आहे .
याची दखल आठ दिवसाच्या आत नाही घेतल्यास पुढील कारवाई करण्यात येईल अशी चर्चा सरपंच संघटनेच्या वतीने चालू आहे.

















