तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी मांडणी झाली ती नाट्य सादरीकरणातून. रवींद्र नाट्यमंदिरातल्या रंगमंचावर रंगलेल्या बहारदार पथनाट्याने रसिकांची मने जिंकली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेचं पथनाट्य सादर करीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक मा. श्री कृष्णप्रकाशजी आवर्जून उपस्थित होते.
रेडबड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर,अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.
चित्रपट मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्यातून समाजप्रबोधन होणे आवश्यक असतं. देशातील सामाजिक समस्यांबाबत लोकांना जागरूक करणे हे साहित्यिक, कलाकार यांचे आद्य कर्तव्य आहे. आपल्यासमोर उभ्या ठाकणार्या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन एका एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी एकत्र आलेल्या ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमच्या विलक्षण प्रयत्नांना दाद देत या चित्रपटाला अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. कृष्णप्रकाश यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सहदिग्दर्शक रेहमान पठाण तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. संगीत श्रेयस देशपांडे यांचे असून गायक कैलास खेर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत. कलादिग्दर्शक शैलेश रणदिवे आहेत.
रेडबड मोशन पिक्चरचा अरविंद भोसले दिग्दर्शित ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ आहे.