सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी विनायक रामकृष्ण कोंड्याल यांची निवड झाली असून, शहराच्या राजकारणात सामाजिक बांधिलकी जपणारा आणि विकासाभिमुख चेहरा महापौरपदी विराजमान झाला आहे. नगरसेवक म्हणून दीर्घ अनुभव, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कामातून निर्माण झालेला विश्वास हे त्यांच्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे.
सन २००७ साली प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोंड्याल यांनी हद्दवाढ भागातून सातत्याने जनतेचे प्रतिनिधित्व केले. सलग चार टर्म नगरसेवक म्हणून काम करताना नागरी समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधांवर त्यांनी ठोस कामगिरी केली. विकासकामांची स्पष्ट दृष्टी आणि प्रशासनावर पकड यामुळे ते प्रभावी नगरसेवक म्हणून ओळखले जातात. महापालिकेतील विविध समित्यांचे सभापतीपद भूषवताना त्यांनी निर्णयक्षम नेतृत्वाची छाप सोडली. शिक्षण, सहकार आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातूनही त्यांनी समाजाशी नाळ घट्ट ठेवली. याच कार्याची पोचपावती म्हणून आज सोलापूरच्या महापौरपदी त्यांची निवड झाली असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापौर विनायक कोंड्याल
थोडक्यात परिचय
** नाव : विनायक रामकृष्ण कोंड्याल
** शिक्षण : बी.ए., एल.एल.बी.
** राजकीय अनुभव : सन २००७ पासून सलग चार वेळा नगरसेवक
** प्रशासकीय भूमिका : स्थायी समिती, विधी समिती, स्थापत्य व उद्यान समिती सभापती
** सामाजिक कार्य : शिक्षण संस्था, सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा
** कामाची ओळख : पाणी, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, नागरी सुविधा
———
परिचय पत्र
नांव : श्री. विनायक रामकृष्ण कोंड्याल (नगरसेवक प्रभाग क्र.१२)
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी
वडीलांचे नांव : श्री. रामकृष्ण सायण्णा कोंड्याल (मा. अध्यक्ष, पद्मशाली ज्ञाती संस्था)
पत्ता : २१०, जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सुपर मार्केट जवळ, सोलापूर.
ज्ञातभाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू
राजकिय कार्य : सन २००७ साली वयाच्या २१ व्या वर्षी सोलापूर महानगरपालिका निवडणूकीत हद्दवाढ भागातून अपक्ष उमेदवार म्हणून बहुमताने निवडून आले. तनंतर आपल्या सामाजिक व विकासात्मक दृष्टीकोन यावर पुढील निवडणुकीत सलग सन २००७, २०१२, २०१७, २०२६ या चार टर्म प्रभागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी जनतेनी दिली.
सभापती पदे भूषविली :
सोलापूर महानगर पालिकेमध्ये स्थायी समिती सभापती (सन २०१२), सोलापूर महानगर पालिका विधी समिती सभापती, सोलापूर महानगर पालिका स्थापत्य समिती सभापती, सोलापूर महानगर पालिका मंडई व उद्यान समिती सभापती, संस्थापक अध्यक्ष विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, संचालक : श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्नालय (सन २०१० पासून)
सामाजिक कार्य —
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय येथे सन २०१० पासुन तज्ञ संचालक म्हणून निवड, रुग्नालयाच्या माध्यमातून असंख्य रुग्नांना मदतीचा आधार तसेच विविध शासकिय योजनेंचा हजारो रुग्नांना लाभ करुन दिला.
विनय ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था या शैक्षणिक संस्थेची स्थापना करुन सन २००७ साली विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय एम.आय.डी.सी. सारख्या कामगार वर्ग असलेल्या भागात भव्य अशी शाळेची इमारत बांधुन हजारो विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचे पवित्र कार्य सुरु केले.
प्रभागातील प्रमुख कामे —
प्रभागातील प्रमुख पिण्याच्या पाण्याची सोय व पाण्याच्या टाक्यांची उभारणी, ड्रेनेज लाईन, दिवा बत्ती संपूर्ण वार्डात कामे अंतर्गत रस्ते व मुख्य रस्ते यांची सोय केली, अशा प्रभावी कामातून हद्दवाढ भागाचा कायापालट करणारा नगरसेवक अशी ओळख निर्माण केली.
१४,३१० मताधिक्य घेऊन विजयी
या विकास कामांच्या बळावर सन २०२६ महापालिका निवडणूकीत सोलापूरातील सर्वाधिक विक्रमी १६,६०० मते मिळवून १४,३१० मताधिक्य देऊन जनतेनी निवडून दिले.
















