सोलापूर – न्यू गोल्डन क्लबने गेल्या सतरा वर्षांपासून मंद्रूप व परिसरातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी केले. मंद्रुप येथील न्यू गोल्डन क्लबच्या १७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, ग्रामसेविका सुजाता व्हनकडे, प्रा.डॉ.कैलास कसबे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, मोहमद अलकमा, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, सुरेश टेळे, शिवानंद लोभे, यासीन मकानदार, प्रा. उमाशंकर रावत, श्रीधर टेळे, भागण्णा अटकर, माजी उपसरपंच मोतीराम चव्हाण, निंबर्गीचे उपसरपंच पिरसाब हवालदार, दानेश शेख, मल्लीनाथ घाले, संतोष बरूरे, प्रवीण कुंभार, शिवराज मुगळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक बबलू शेख व सूत्रसंचालन बिलाल शेख यांनी केले तर आभार आरिफ नदाफ यांनी मानले.



























