नीट युजी परीक्षा २०२४ च्या बाबतीत मोठी बातमी आली आहे. बिहारमधील एका विद्यार्थ्याने नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याची कबुली दिली आहे. पटणा पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात विद्यार्थ्याने, NEET परीक्षेच्या एक दिवस आधी सर्व प्रश्न कसे लक्षात ठेवले गेले आणि दुसऱ्या दिवशी NEET परीक्षेत दिलेल्या प्रश्नपत्रिकेशी ते कसे जुळले..? याबद्दल कबुली दिली आहे. त्यामुळे आता UGC NET पाठोपाठ NEET परीक्षाही रद्द होणार का याबद्दल चर्चा रंगात आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...