अकलूज – मकर संक्रातीच्या सणा निमित्ताने आज आठवडा बाजार व उद्या भोगी असल्याने अकलूज बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसत होते.
संक्राती सणासाठी लागणारे मातीचे खण विजय चौक येथे मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे दिसत आहेत तालुक्यातील कुंभार समाजाने एकच भाव काढल्याने वाणाचे भाव टिकून आहेत कुंभार समाजाच्या नेत्या ज्योती कुंभार यांनी सर्वांची एकीकरु न एकच भावाने खण विक्रीसाठी ठेवले आहेत 50 ते 100 रुपये पर्यंत त्याचे किंमत आहे रात्री उशिरापर्यंत व उद्या सकाळपर्यंत हा बाजार चालणार आहे त्याचबरोबर भोगी सणासाठी लागणाऱ्या भाज्या मोठ्या प्रमाणावर विक्री साठी आहेत जुने बस स्थानक मंडई पासून ते जुने पोलीस स्टेशन पर्यंत विक्रेते बाजू रस्त्याच्या दुतर्फा शेतकरी व विक्रेते बसले आहे त त्याच बरोबर शंकर नगर रोडवरही मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचा बाजार भरला आहे आणि आठवडा बाजारामध्ये बाजार तळावरही मोठ्या प्रमाणावर भाजी विक्रीस आली आहे.
भोगी सणासाठी लागणारे वाण गाजर घेवडा,वांगी, हरभरा, हिरवी,मिरची, भुईमूग शेंगा आणि मुख्य म्हणजे चाकवताची भाजी,बोरे मोठ्या प्रमाणावर विक्रीस येऊ नही बोरे शंभर रुपये पाव किलो भाजी दहा ते पंधरा रुपये व कोणतीही भाजी वीस रुपये 250 ग्रॅम ज्वारीचे कणीस वीस रुपयाला एक त्याचबरोबर विड्याची पाने 80 ते 100 रुपयाला 25 नग मध्ये विकली जात होती त्याचबरोबर वाना साठी लागणारे तिळगुळ, सुपारी, हळकुंड, राळेचे तांदूळ आधी सणासाठी लागणाऱ्या वाणास मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
रात्री उशिरापर्यंत हा बाजार चालूच होता शिव शंकर बाजार येथे संक्रातीनिमित्त लुटल्या जाणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर झालेले आहे तसेच बाजारपेठेतील किराणा दुकानांमध्ये महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती सवासणीचे वाण बांगड्या साठी विजय चौक येथे वेगळा बाजार भरला होता


















