राजस्थानने आरसीबीला पराभूत करत क्वालिफायर-२ हा सामना गाठला होता. त्यामुळे आता राजस्थानचा संघ हा सामनाही जिंकून अंतिम फेरीत पोहोचेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण यावेळी ‘शबनम’ राजस्थानचा घात केला आणि त्यांना या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळाले.
राजस्थानने या सामन्याचा टॉस जिंकला. त्यावेळी संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले आणि तिथेच हा सामना राजस्थान जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. कारण त्याचवेळी एक समीकरण समोर आले होते आणि त्यामुळे टॉस सामन्याचा बॉस ठरू शकतो, असे म्हटले जात होते. टॉस जिंकल्यावर राजस्थानने पहिल्या डावात चांगला खेळ केला. हैदराबाद हा मोठी धावसंख्या उभारणारा संघ आहे, ते २०० धावा सहज पार करतात. पण या सामन्यात मात्र राजस्थानने त्यांना १७५ धावांत रोखले. त्यामुळे पहिल्या डावात तरी सर्व काही राजस्थानच्या बाजूने सुरु होते.
दुसऱ्या डावात मात्र राजस्थानला ज्या गोष्टीची अपेक्षा होती, ते घडलं नाही. कारण त्याचवेळी राजस्थानच्या संघाला धोका मिळाला आणि सामना ते हरणार, हे जवळपास निश्चित समजले जात होते. कारण जी सर्वात मोठी गोष्ट घडणार होती, ती घडलीच नाही आणि त्याचाच राजस्थानला मोठा धक्का बसला. कारण राजस्थानने टॉस जिंकून जो निर्णय घेतला होता तो ‘शबनम’च्या जोरावर घेतला होता. शबनम म्हणजे दव. मैदानात दव पडलं की चेंडू जड होतो आणि तो लगेच बॅटवर येतो. त्यामुळे फटकेबाजी करणं सोपं जातं. पण जजर दव नसेल तर चेंडू संथपणे बॅटवर येतो आणि मोठी फटकेबाजी करता येत नाही. त्यामुळे जेव्हा राजस्थानचे खेळाडू फलंदाजीला आले तेव्हा दव पडलेले नव्हते आणि तेव्हाच राजस्थान हा सामना जिंकू शकत नाही, हे जवळपास स्पष्ट झाले होते आणि तीच गोष्ट या सामन्यात पाहायला मिळाली. त्यामुळे दवाच्या जोरावर राजस्थानने दुसरी फलंदाजी करण्यावर भर दिला होता. पण दव पडलेच नाही आणि तेच त्यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले.
दव ही छोटी गोष्ट वाटत असली तरी ती क्रिकेटच्या सामन्यात मोठी ठरते. कारण दवामुळे बरेच संघ दुसरी फलंदाजी करून धावांचा पाठलाग करायला प्राधान्य देतात. हीच गोष्ट राजस्थान करू पाहत होतं, पण यावेळी दवाने त्यांचा घात केल्याचे पाहायला मिळाले.