कंधार | (प्रतीनीधी )
हिंदूस्थानातील बहुंताश मंदिरे शासनाच्या अधिकाराखाली आहेत या मंदीरावर शासनाचा कब्जा असुन मंदिरातील जमलेले हाजारो कोटि रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होत आहेत परंतु ह्या रुपयाचा फायदा हिंदूना होत नसुन हा ईतरञ वापरला जात आहे शासनाने सनातन बोर्ड स्थापन करुन मंदीरातील पैसा या बोर्डाच्या माध्येमातुन हिंदु समाजाच्या प्रगती करीता वापरला जावा असे प्रतिपादन _आंतरराष्ट्रीय कथाकार देवकीनंदजी ठाकुर यांनी श्री क्षेत्र उमरज येथील येथील कार्यक्रमात हाजारो भाविकभकांना संबोधताना केले .
श्री क्षेञ उमरज येथे १०८ कुंडी यज्ञ व कलशारोहण कार्यक्रमा निमित्त दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पासुन आंतराष्ट्रीय कथाकार देवकीनंदजी ठाकुर यांच्या मधुर वाणीतुन भागवत कथेस प्रारंभ झाले आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी कथेच्या पाचव्या दिवशी हाजारो जनसमुदायांना संबोधताना पुढे असे म्हणाले कि हिदुस्थान मध्ये हिंदु धर्मावर शासनाकडून अन्याय होत आहे देशातील हिंदु मंदिरातील प्रत्येक दिवशी 5 हजार कोटि रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होत आहेत याचा उपयोग शासनाने सनातन बोर्ड स्यापन करुन या बोर्डाच्या मार्फत फक्त हिंदु समाजातील मुला मुलीच्या शिक्षण , आरोग्य ,युवकांचा उद्योग निर्मिती साठी झाला पाहीजे .
सनातन बोर्ड सनातन संस्कृतीचे रक्षण करेल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल. वक्फ बोर्ड असू शकतो, तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही ?असा सवाल शासनाला ठाकुर यांनी केला .जो मदिरा दारु पीतो.जुवा खेळतो तो अशा लोकांची जो संगत करतो तो कदापि सनातनी आसु शकत नाही .तुम्ही धर्माची रक्षा धर्म तुमची रक्षा करेल .या कार्यक्रमाला आलोट जनसमुदाय उपस्थितीत होता
श्रीक्षेत्र उमरज येथे महाराष्ट् राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भा.ज.पा.चे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण हे या कार्यक्रमात बोलताना असे म्हणाले नामदेव महाराज देवस्थान श्री क्षेत्र उमरज चे मठाधीपती एकनाथ महाराज यांनी खुप मेहनतीने मंदीराचे काम पुर्ण केले या नामदेव विठ्ठल मंदिराला पाहिल्या नंतर आयोध्यातील राममंदीराची आठवण झाली .केंद्रातील सरकार व राज्ये सरकार आमचेच आहे त्यामुळे या देवस्थान ला ब दर्जा मिळवुन देण्यास कट्टिब्दध आहे .असे चव्हाण म्हणाले यावेळी मठाधीपती एकनाथ महाराज ,एकनाथ दादा पवार आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या अर्धागंणी प्रतिभाताई चिखलीकर ,भा.ज.पा.चे जिल्हाअध्यक्ष संतुकराव हंबर्ङे ,संतोष पांडागळे ,चंद्रसेन पाटिल ,यांच्यासह आदि कार्यकर्त्ते उपस्थितीत होते