Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चोरी करणारे परप्रांतीय टोळीतील तीन आरोपीना अटक; २० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

तरुण भारतbyतरुण भारत
January 3, 2026
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – फिर्यादी आनंद हणुमंतराव भोसले रा. यशवंतनगर ता. माळशिरस यांनी, दिनांक २६/१२/२०२५ रोजी रात्रौ ०१. ०० वा. ते सकाळी ११.०० वा. चे दरम्यान फिर्यादीचे संयुक्तानगर, यशवंतनगर येथील बी. एस. कंस्ट्रक्शन चे ऑफीसचे ड्रॉवर मधील ५,४५,०००/- रुपये रोख रक्कम ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने स्वतःचे फायद्याकरीता चोरुन नेली आहे म्हणून वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. ८४७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०५ (a), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा अकलुज पोलीस ठाणे कडील तपास पथक पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांचे नेतृत्ताखाली शोध घेत असताना अकलुज पोलीस ठाणे कडील पोलीसाना घटनेच्या ठिकाणी काही संशयीताचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त झाले होते सदरचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक चार चाकी वाहनाचा नंबर प्राप्त झाला तो नंबर व संशयीताचे फुटेज संपुर्ण देशातील पोलीसाचे वेगवेगळया व्हॉटसअॅप ग्रुपवर पाठविण्यात आलेले होते.

सापुतारा पोलीस ठाणे राज्या गुजरात यांना देखील सदरचे फुटेज पाठविण्यात आलेले होते सापुतारा पोलीस ठाणे हददीत नाकांबदी दरम्यान तीन संशयीत इसम मिळुन आल्याने व सीसीटिव्ही फुटेज मधील वाहन व इमस हे सदर इमसाशी मिळते जुळते असल्याने सापुतारा पोलीस ठाणे यांनी अकलुज पोलीस ठाणे येथे संशयीता बाबत कळविले आहे.

त्याप्रमाणे लागलीच मा. पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक सो ग्रा यांचे आदेशान्वये पोसई कदम व तपास पथक सापुतारा येथे खाना केले. सदर ताब्यात घेतलेल्या आरोपी नामे १) अनिलभाई रेवाभाई भांभोरे वय २७ वर्षे, २) मिथुनभाई रेवाभाई भांभोरे वय ३४ वर्षे दोघे रा. नाडेलगांव धुळ महोडी फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात, ३) वकील तेजसिंग भांभोरे वय ३२ वर्षे रा. अंबाली खजुरीया शिमोडा, फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथकाने तपास केला असता, आरोपीनी सदरचा गुन्हा अकलुज येथे केलेल्या कबुली दिली असुन सदर गुन्हयात चोरी केलेला एकुण ५,४५,०००रु/- रक्कमे पैकी ५,१३,१८० रु/- हस्तगत केली असुन गुन्हया करताना वापरलेले वाहन हुंडाई केटा कार क्रमांक GJ-20CB-2646 जप्त केलेले आहे.

सदर आरोपीना ताब्यात घेवुन अकलुज पोलीस ठाणे येथे आणुन त्यांची ५ दिवस पोलीस कोठडी मा न्यायालयाकडुन मंजुर करुन घेनुन आरोपीकडे अधिकचा तपास केला असता यांनी अश्याचे प्रकारे सांगोला पोलीस ठाणे हददीत चोरी केल्याची कबुली दिली असुन त्या गुन्हयात चोरी केलेल्या चांदीचा मुददेमाल देखील आरोपीतांकडुन जप्त करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयातील आरोपीनी गुन्हा करताना वापरलेली वाहन हुंडाई केटा कार क्रमांक GJ-20CB-2646, तीन मोबाईल, एक लोखंडी कटावणी, एक काळया रंगाची बॅग, एक लोखंडी पक्कड असे एकुण २०,३६,६८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अकलुजचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम व पो. हवा. विक्रम घाटगे, पो. हवा. विनोद साठे, पो. हवा. सुहास क्षिरसागर, पो. हवा. शिवकुमार मदभावी, पो.हवा. आभिजीत कुंभार, पो.कॉ. रणजित जगताप, पो.कॉ. दत्तात्रय खरात, पो.कॉ. सोमनाथ माने, पो.कॉ. पंडीत गवळे तसेच सायबरचे पो. हवा. तांबोळी यांनी कामगिरी केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करीत आहेत

Post Views: 41
Previous Post

जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही

Next Post

भेसळ खतामुळे बाधित द्राक्षबागेला आमदार अभिजीत पाटील यांची भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भेसळ खतामुळे बाधित द्राक्षबागेला आमदार अभिजीत पाटील यांची भेट

ताज्या बातम्या

उन्हाळा बाधू नये म्हणून घ्या पृथ्वीवरचे अमृत … डॉ. मुकुंद लिमये

March 14, 2026

पिलीव येथील भाजपच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन.

March 14, 2026

संजय राऊतानी जय श्रीराम नाऱ्याची केली चेष्टा…

March 14, 2026

खा. प्रणिती शिंदे यांच्या प्रशासनाला गॅसबाबत सूचना…..

March 14, 2026

सुळेवाडी येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय योजनांच्या शिबीराचे आयोजन.

March 14, 2026

पंडित भीमराव कनकधर आणि पंडित विठ्ठलराव क्षीरसागर पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात गुरु स्मरण सोहळा

March 14, 2026

नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमीच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

March 14, 2026

दौड एसआरपीएफ दलातील विलास सर्जेराव शिंदे (वय ३५) या जंवानाने भुळेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0734665

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697