रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूरचा पूर्णपणे वेगळा अवतार पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील त्याचा लूक आणि अभिनय पाहून सगळेच प्रभावित झाले होते.
रणबीरसोबत, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी ‘अॅनिमल’मध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे आणि आता ओटीटीवरही धमाल करण्यास सज्ज आहे.
रणबीर कपूरचा अॅनिमल हा सिनेमा 26 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत.