तभा फ्लॅश न्यूज : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील स्मशानभूमी परिसरात पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. गावातील भाविकांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमात सरपंच पंचफुला बोर्डे, ग्रामविकास अधिकारी एच.बी. साळवे, प्रा. अनिल मगर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. गावातील महिलांनीही सक्रिय सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.
दिनेश बोर्डे आणि शैलेश बोर्डे यांनी आभार मानले. ग्रामस्थांच्या एकजुटीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

















