हदगाव – शहरातील आदर्श विद्यार्जन मंडळ द्वारा संचलित पंचशील माध्य व उच्च माध्य विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजल्यावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सदस्य सुनील हरिहरराव सोनुले यांनी या दु:खद घटनेचे वृत्त समजताच शोकसभा घेऊन दिवंगत अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना संस्था आणि शाळा प्रशासना तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजितदादा पवारांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून मनाला वेदना देणारे आहे असे सुनिल सोनुले यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
पर्यवेक्षक अनिल दस्तूरकर यांनी शोकसभेच्या सूत्रसंचालनातून अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना संस्था आणि शाळा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी पंचशील माध्य व उच्च माध्य विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.























