नवीन नांदेड – सिडकोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गटा) चे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच हाडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सिडको हडको परिसरातील नव्याने निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक संजय पाटील घोगरे यांना अजित दादा पवार यांच्या दु:खद घटनेचे वृत्त समजताच शोकसभा घेऊन दिवंगत अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नूतन नगरसेवक संजय पाटील घोगरे, सतीश बसवदे, राजू लांडगे, वैजनाथ देशमुख, विनय गिरडे तसेच जीवन पाटील घोगरे यांच्यासह सिडको हडको परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गेली तीस वर्षापासून अजितदादा यांच्या संपर्कात असलेले व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जीवन पाटील घोगरे यांना यावेळी आश्रु आनावर झाले.






















