भोकरदन : येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या वतीने सैन्य दलातील विविध विभागात भरती झालेले विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव प्रा.डॉ. अंकुश पाटील जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सैन्यात भरती होणे ही केवळ नोकरी नसून ती देशसेवेची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण काळात शिस्त,वेळेचे पालन आणि प्रामाणिकपणा जपावा. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक सक्षमतेवरही भर द्यावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदर राखत संघभावनेने काम करावे. कोणत्याही अडचणीसमोर हार न मानता धैर्याने व संयमाने पुढे जावे.
आई-वडील, गुरुजन व देशाचे नाव उज्ज्वल ठेवण्यासाठी नेहमी प्रामाणिक सेवा करावी, असे आवाहन प्रा. डॉ. अंकुश पाटील जाधव यांनी भरती झालेल्या विद्यार्थ्यांना केले. तसेच सुरंगळी येथील जि.प.प्रा. शाळांचे शालेय समिती चे उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वर्पे यांची नियुक्ती झाली यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रा डॉ अंकुश पाटील जाधव, संचालिका सौ अनिताताई अंकुश जाधव, रत्नमालाचे संचालक राजेंद्र देशमुख(जाधव), सौ जाधवताई व सुरेश बनकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी गोपाल शिंदे (सीआयएसएफ),
अविनाश शिंदे (सीआयएसएफ ),
विशाल रोडे (सीआयएसएफ ),
रोहित चोरमारे (बीएसएफ ),
पवन सहाने (सीआयएसएफ),
शुभम मैंद (सीआयएसएफ),
परमेश्वर शिरसाट (सीआयएसएफ),
करण कोल्हे (इंडियन नेव्ही ),
आणि ज्ञानेश्वर वर्पे यांची जिल्हा परिषद शाळा सुरंगळी येथे शालेय समिती उपाध्यक्षपद आदींचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्रा उमेश घोडके, स्वप्नील बनकर आदी उपस्थित होते.






















