Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रिसिजन संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी सुरांनी मन जिंकले, स्वरांनी आत्मा

तरुण भारतbyतरुण भारत
February 8, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात शनिवारची (दि.७) संध्याकाळ श्रोत्यांसाठी अविस्मरणीय अशीच ठरली. व्यासपिठावर सूर बोलत होते आणि मन मंत्रमुग्ध होत होतं. प्रिसिजन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित अकराव्या प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोलापूरकर रसिकांनी केवळ संगीत ऐकलं नाही, तर ते मनापासून अनुभवलं. पहिल्या दिवशी सूरांनी मन जिंकले अन् स्वरांनी आत्मा.

पहिल्या सत्रात प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांनी राग पुरिया कल्याणने जणू संध्याकाळी एक शांत दीप प्रज्वलित केला. सतारीचा पहिला सूर उमटताच सभागृहातील प्रेक्षक शहारले. आलापातून हळूहळू उलगडणारे सूर मनाचा खोलवर ठाव घेत होते. ते कधी मौन प्रश्न विचारत होते, तर सूर सतारीतून त्यांना उत्तर देत होते. विलंबित बंदिशीतल्या गहिऱ्या छटा आणि द्रुत बंदिशीतील तेजस्वी उंची यांतून एक भावप्रवास उलगडत गेला. मारवा थाटातील या रागात सतार जणू स्वतःशीच संवाद साधत होती आणि रसिक त्या संवादाचे साक्षीदार बनले होते. तबल्यावर पांडुरंग पवार यांनी दिलेली समर्थ साथ या सुरेल संभाषणाला अधिक अर्थपूर्ण बनवत होती. सतार आणि तबल्याच्या या जुगलबंदीतून जे काही घडत होतं, ते ऐकणं नव्हतंच, ते जगणं होतं. 

सुरुवातीला निखिल पटवर्धन यांनी सतारीबद्दल सांगितलेले काही शब्दही रसिकांच्या मनाशी थेट नातं जोडणारे ठरले.

दुसऱ्या सत्रात स्वरांनी भावनांचा हात धरला. सुप्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांच्या आवाजातली सोज्ज्वळता सभागृहात पसरताच वातावरण अंतर्मुख झालं. राग जयताश्रीमधील त्यांचे सूर मनाला अलगद स्पर्श करत होते. जणू कुणी आपल्याशी हळूच संवाद साधावा असे. पंडित कुमार गंधर्वांचा तराना सादर करतानाच आलेगावकर यांनी स्वरांमधल्या आघातांचे महत्वही स्पष्ट केले. शुद्ध निषादात सादर राग बिहागडामध्ये तर रसिक पूर्णपणे हरवून गेले आणि संत कबीरांच्या निर्गुणी भजनावेळी… काळ जणू थांबलाच. सभागृह स्तब्ध झाले. फक्त उरले ते भाव. प्रत्येक ओळ मनात खोलवर झिरपत होती, डोळ्यांत नकळत ओल आणत होती. हार्मोनियमवर सौरव दांडेकर, तबल्यावर अजित किंबहुने आणि तानपुऱ्यावर प्राची जोगळेकर आणि स्वराली आलेगावकर यांनी दिलेली साथ या भावनांना आधार देणारी ठरली. भजन संपल्यानंतर क्षणभराची शांतता आणि त्यानंतरचा ‘वाहवा’ हा रसिकांच्या अंतःकरणातून उमटलेला प्रतिसाद होता.

सायंकाळी अचूक ६.२५ वाजता सुरू झालेल्या या मैफलीने पहिल्याच दिवशी महोत्सवाची उंची निश्चित केली. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा, मयुरा शहा, डॉ. सुधांशु चितळे आणि डॉ. किरण चितळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले आणि त्या दिव्याच्या उजेडात संगीताचा हा भावयज्ञ सुरू झाला.

आज पुन्हा भावनांचा ओघ

रविवारी (दि.८) महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही रसिकांसाठी संगीताची भावसमृद्ध संध्याकाळ सजणार आहे. पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक एस. आकाश यांच्या बासरीतून निर्मळ सूर उमटणार आहेत तर यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिनमधून भावनांचा नवा संवाद उलगडेल. तबल्यावर ईशान घोष साथ देतील.

महोत्सवाच्या अंतिम सत्रात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या आवाजातून भक्ती, भाव आणि शास्त्रीयतेचा संगम अनुभवायला मिळणार असून, तबल्यावर प्रशांत पांडव आणि हार्मोनियमवर अभिषेक शिनकर साथसंगत करतील.

हा महोत्सव म्हणजे केवळ सूर-स्वरांची मैफल नाही.तो मनाशी मन जोडणारा, आठवणींत रेंगाळणारा आणि अंतःकरणात दीर्घकाळ उजळत राहणारा संगीतअनुभव आहे.

Post Views: 24
Previous Post

जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळ  पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीला

Next Post

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

ताज्या बातम्या

तपासणी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास; संतप्त प्रवाशांची तक्रार.

February 8, 2026

कळंब तालुक्यात विक्रमी मतदान; सायं. ५.३० पर्यंत ६६.१७% मतदारांनी बजावला हक्क..#public #news

February 8, 2026

श्री रामलिंग देवस्थान, रामपूर ता.देगलूर, येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले

February 8, 2026

माहूर कृउबाला नवीन शेतकरी भवनासाठी दिड कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता.#public #news

February 8, 2026

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0666418

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697