सोलापूर – कोंडा नगर अक्कलकोट रोड येथे दोन नंबर देशमुख नंदीधवज काठीची पूजा यजमान पद्मशाली समाज सेवा निवृत्ती संघाचे उपाध्यक्ष व जांबमुनी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनिल कन्ना यांचे हस्ते संपन्न झाले.त्यावेळी अनेक मान्यवर व भक्त उपस्थितीत होते.
नंदी ध्वजाचे मास्तर अनंत अंजिखाने त्याचे सहकारी तसेच लक्ष्मीकांत दंडी, उमापती मिठ्ठापल्ली,देविदास मेरगु,दशरथ इंदापुरे,सत्यनारायण बारदेपूर,श्रीनिवास वल्लाकाटी, बाबा गोप,अविनाश संगा, बेनगिरि, चिप्पा,अलवाल हे उपस्थित होते.
सध्या सोलापुरात धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे.शाकंभरी पौर्णिमा निम्मित प्रत्येक देवदेवांचा मंदिरात मोठ्याप्रमाणात सजावट करीत आहे.संक्रांती पूर्व संधेला ठिकठिकाणी नंदी ध्वज काठ्यांची पूजा भक्तांचा हस्ते फार पाडत आहे.
























