बार्शी – एमआयटी व्हीजीएस (MIT VGS) बार्शीच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पार पडली.
प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान म्हणजेच चौंडी या ठिकाणी भेट देण्यात आली. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे स्मारक व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे प्राचीन शिल्प पाहिले. तसेच बागेत बारा राशींचे माहिती फलक व प्रतिकात्मक पुतळे व पहायला मिळाले. यातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ठेवा व ज्ञानमुल्यांची ओळख करुन देण्यात आली. त्यानंतर करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध कमलादेवी मंदिरास भेट दिली. यातून विद्यार्थ्यांना इतिहास व श्रद्धेचा परिचय करुन देण्यात आला आणि शेवटी परंडा तालुक्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला या ठिकाणी भेट देण्यात आली. त्या ठिकाणी असणाऱ्या प्राचीन तोफा, मंदिरे, मज्जिद हे एकतेचे प्रतीक आहे याची जाणीव व ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आली.
या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती व श्रद्धेचा प्रत्यक्ष अनुभव करुन देणे हा होता. विद्यार्थ्यांनी या सहली दरम्यान शिस्त, उत्साह व एकोपा दाखवला. शाळेचे मुख्याध्यापक अनिश नाथ यांनी अशा सहलीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होते व विविध अनुभव मिळतात, असे सांगितले. तसेच सहल नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.


















