सोलापूर : डी.एस.टी.एस. मंडल संचलित युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलने एलिमेंट्री व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत यश संपादन केले . विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व कायम राखत शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही जोपासली आहे.
या शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत २०२५-२६ या वर्षी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व शाळेचा १०० टक्के निकाल लागला .या चित्रकला स्पर्धेत ए श्रेणीमध्ये ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एलिमेंट्री परीक्षेत ईशान्वी नरके , उत्तरकर स्वामिनी , बागलकोटी परी तसेच इंटरमीडिएट परीक्षेत, संगमेश्वर गुड्डड तसेच बी श्रेणीमध्ये २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.संस्थेच्या संस्थापक राजशेखर शिवदारे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डी.एस.टी.एस मंडळाचे चे सर्व पदाधिकारी शेटे , अंजली तिवारी , शुभदा उपासे , पूजा बाजपेयी यांनी पण विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना शाळेच्या चित्रकला शिक्षिका अनुश्री कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.























